प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड[संपादन]
इ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.
सन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)[संपादन]
उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे.
इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही. ही माहिती अज्ञात आहे. सम्राट अशोकानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण झाले.
इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.
आजचे बहुतेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत, असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.
मराठा साम्राज्य[संपादन]
१७व्या शतकाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणीने घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करुन ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.
ब्रिटिश राजवट[संपादन]
बहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[१] अल्पसंख्यकात बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[१]
सामाजिक इतिहास[संपादन]
ब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी होती. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये).
जाती आणि समाज[संपादन]
मराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[२]
हिंदू जाती-समाज[संपादन]
- आगरी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. आगरी लोक खाऱ्या पाण्यापासून मीठ बनवतात.
- चांभार – जनावरांच्या कातडीपासून वस्तू बनवणे हा यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीत मोडतो. २०११ मध्ये यांची लोकसंख्या १२ लाख होती.
- माळी -माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे.
- चांद्रसेनीय कायस्थ प्रभु – हा उच्च-विद्याविभूषित क्षत्रिय समाज आहे.
- भोई - अहिराणी भाषा बोलणाऱ्या २२ उप-जातींपैकी एक हा समाज आहे.
- लोणारी - हा कोळसे तयार करणारा समाज आहे हा "कुणबी"या जातसमूहातील एक उपजातसमूह आहे. हे प्राचीन भारतातील महाजनपदातील "मल्लवंशीय" आहेत. सद्या महाराष्ट्रात त्यांचा ओ.बी.सी.वर्गात समावेश आहे.
- धनगर – हा मेंढ्या पाळणारा समाज आहे. महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जातीत यांचा समावेश होतो.
- कासार - हा समाज तांब्याची भांडी बनविणारा व विकणारा तसेच बांगड्या विकणारा समाज आहे.
- गुरव – हा समाज हिंदू मंदिरात पाहिला जातो कारण पुजारी ह्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
- कोळी – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
- कुणबी — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय मराठा समाज याला स्वतःचीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा ओबीसी प्रवर्गात मोडतो.
- मातंग – झाडे व त्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.
- मराठा – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय क्षत्रिय वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
- महार – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.[३] बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करत बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.[४][५] हा अनुसूचित जातीत मोडतो.
- पाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे) – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.
- वंजारी — काही शतकांपूर्वी पासून राजस्थानमधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
- रामोशी
- वाणी – हा व्यापार करणारा समाज आहे.
- आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
- गवळी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
- कामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बोगदे या जमातीतील लोकांनी बांधले.
- तेली समाज: हा समाज विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळतो.पूर्वीच्या काळात तेल काढणार्यास/विकनार्यास तेली म्हणायचे.हा समाज १८ पगड जातीपैकी एक होता.हा समाज (OBC) अनुसूचित जाती प्रवर्गात मोडतो.
- नाभिक/वारिक: हा समाज केस कापन्याचा व्यवसाय करतो.
अ-हिंदू समाज[संपादन]
महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक[संपादन]
भारतातील दुसऱ्या राज्यात[संपादन]
जसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात.
भारताबाहेरील मराठी[संपादन]
१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते.
पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.
संस्कृती[संपादन]
खानपान[संपादन]
marathi people was eat the bhaji and bhakari and also zunaka bhakari now in modern life they eat some forign foods because litercy is incresing so also they eat there ancient food (traditional foods)

No comments:
Post a Comment